पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’अभिजात मराठी आणि कुंकू ते दुनियादारी’ या विषयावर डॉ. राजेंद्र थोरात यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्य डॉक्टर वंदना पिंपळे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विजय बालघरे,डॉ. विठ्ठल नाईकवडी,प्राध्यापिका शर्मिला देवकाते,डॉ.अर्जुन डोके,डॉ.गोरक्षा डेरे,डॉ.विजय घाडगे,डॉ.विजय घारे, डॉ.जितेंद्र वडशिंगकर,अमृता इनामदार, गौरी पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय बालघरे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा अभिजात झाली पण त्यामुळे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. मराठी भाषा ही दैनंदिन व्यवहारात न्यूनगंड न बाळगता प्रत्येक माणसानेआत्मविश्वासाने वापरली पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात यांनी अभिजात भाषा होण्यासाठीचे निकष,त्यासाठी केलेले प्रयत्न, मराठी भाषेचा समृद्ध वारसा प्रारंभी कथन केला.यानंतर त्यांनी मराठी भाषा विकासात ज्या कवी, लेखकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असे संत-पंत-तंत ते कुसुमाग्रजांपर्यंत सर्वांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच ‘कुंकू’या चित्रपटापासून सुरू झालेला मराठी चित्रपटाचा प्रवास व विविध कलाकृतीवर आधारलेल्या श्यामची आई,जोगवा, नटरंग, जैत रे, जैत, बनगरवाडी,सैराट,दुनियादारी इत्यादी चित्रपटांचे महत्त्व व त्यांच्या निर्मितीमागील सर्व घटकांचा सांगोपांग आढावा घेतला. सर्वांनीच मराठी चित्रपट व मराठी भाषा टिकवण्यासाठी कटीबद्ध राहिले पाहिजे याची आठवण सर्वांना करून दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाच्या प्राचार्य व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संगीता जगताप यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या समृद्ध परंपरांचा व भाषेचा आपण निश्चितपणे अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषा तिच्या सर्व भाषिक अविष्कारांसह प्रभावीपणे वापरता आली पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहावे असे स्पष्ट केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रंथालय विभाग प्रमुख कॅप्टन विठ्ठल नायकवडी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.वंदना पिंपळे यांनी मानले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शर्मिला देवकाते यांनी केले.
Discussion about this post