सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापुर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे 22 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय गौरव कोलते आणि व्यवसाय मार्गदर्शक माननीय संजय शितोळे उपस्थित होते. मा. संजय शितोळे यांनी मार्गदर्शन करताना व्यवसाय म्हणजे काय हे स्पष्ट करताना व्यस्त असणे म्हणजे व्यवसाय करणे. व्यवसाय करीत असताना ग्राहकाच्या गरजा ओळखणे ग्राहक हा केंद्रबिंदू मानून व्यवसाय स्वीकारणे गरजेचे आहे. ग्राहकाच्या गरजा भागविणे हा व्यवसायाचा हेतू असायला हवा. आपल्या आजूबाजूला व्यवसायाच्या अनेक संधी आहेत त्या संधी ओळखून व्यवसाय मध्ये तरुणांनी उतरणे आवश्यक आहे शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य आधारित शिक्षण हे आजच्या काळाची गरज आहे. काळानुसार व्यवसायात बदल केले पाहिजेत व्यवसाय म्हटलं की त्यात प्रतिस्पर्धी आले आणि त्या प्रतिस्पर्ध्यांचा विचार करणे गरजेचे आहे. व्यवसायात गुणवत्ता व सातत्य महत्त्वाचे असून, वेळेचे महत्व ,आर्थिक नियोजन, हिशेबी वृत्ती, जागेची निवड आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास यश प्राप्त होते. ग्राहक आकर्षित करण्याचे कला ही व्यावसायिकांकडे असायला हवी . व्यावसायिकांकडे प्रामाणिकपणा कल्पकता आणि नाविन्यता असल्यास यश हमखास मिळते, असे देखील त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.याप्रसंगी माननीय विजय कोलते यांनी मार्गदर्शन करताना व्यवसाय म्हणजे काय तर 24 तास नोकरी म्हणजे व्यवसाय असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व्यवसाय करीत असताना अनुभवी व्यक्तींशी चर्चा करणे विविध प्रकल्पांना भेटी देणे त्यातून अनुभवाचे दान आपल्या पदरात पाडणे तसेच विविध व्यवसायिकांच्या आत्मकथा आत्मचरित्र वाचून प्रेरणा मिळवणे आणि जिद्द चिकाटी ध्येय असेल तर यश मिळते यासाठी अविरत परिश्रम करण्याची तयारी ठेवणे तरच व्यवसाय आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो हे त्यांनी विविध उदाहरणातून आपल्या आलेल्या अनुभवातून यावेळी सांगितले.या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार शितोळे सर यांनी भूषविले त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी हा व्यवसायभिमुख असायला हवा त्याने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन व्यवसाय निवडायला हवेत आपला प्रदेश आपली माणसं त्यांच्याशी असणारा आपला संवाद याचा फायदा नक्कीच व्यवसायाला होतो या भागामध्ये पर्यटनाच्या व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे नशीब आजमावायला हवे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन विभागाचे समन्वयक प्रा संदीप लांडगे यांनी उद्योग आणि व्यवसाय यातील फरक आणि व्यवसायाचे महत्त्व या कार्यशाळेचे उद्देश आपल्या प्रास्ताविकातून मांडले. या कार्यशाळेत सहभागी व्यक्तींचा परिचय वाणिज्य विभागाचे प्राध्यापक ननवरे प्रल्हाद यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्रा. अंकिता महांगरे यांनी केले तर आभार वाणिज्य विभागाचे प्रमुख जीवन गायकवाड यांनी मानले.यावेळी डॉ.संगीता घोडके, डॉ. हिमालया सकट, प्रा.सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारले, प्रा.भगवान गावित, डॉ.सचिन घाडगे,प्रा.माऊली कोंडे, प्रा. कोमल पोमान, प्रा. दयानंद जाधवर, प्रा.महेश कोळपे, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, प्रा.भूषण समगिर, प्रा.कोमल चोरगे आणि कार्यालयातील सर्व प्रशासकीय कर्मचारी उपस्थिती होते.
Discussion about this post