प्रतिनिधी:- कानिफनाथ मांडगे (9890954132)
दौंड ता.२५ जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरण करणेच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत सुमारे ४३८.४८ कोटी रुपयांच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्याच्या कामाला देखील प्रत्यक्षात लवकरच सुरुवात होणार आहे. अशी माहिती दौंड चे आमदार राहुल दादा कुल यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आज या योजनेच्या लाभार्थी असलेल्या जिरेगाव, वासुंदे, कौठडी हिंगणीगाडा, पांढरेवाडी, रोटी, पडवी, कुसेगाव, देऊळगाव गाडा, खोर आदी गावातील शेतकरी व नागरिकांची आज बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.
जनाई- शिरसाई योजना सुधारित करुन बंदिस्त पाईपलाईनने केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीबचत होऊन आपल्या तालुक्यातील अधिक क्षेत्राला लाभ होणार आहे. काही समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याचे तलावाचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे, सर्वेक्षण करीत असताना येणाऱ्या सर्व अडचणी समजून घेऊन तलाव भरणेसाठी करण्यात येणाऱ्या उपयोजना करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात यावेत सर्व शेतकरी व नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार राहुल दादा कुल यांनी दिल्या.
Discussion about this post