लोहा प्रतिनिधी
बुधवार दिनांक 26 2 2025 सकाळी सातच्या सुमारास गणेश नगर वाय पॉईंट नांदेड या ठिकाणी एका युवकाचा खून करण्यात आला, खंजिराने त्याच्यावरती वार करण्यात आले यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. नांदेड मध्ये सातत्याने घडत असलेल्या हाणामारी चोरी गोळीबार खुनाच्या घटना या काही नवीन नाहीत ,त्या सातत्याने घडत आहेत मात्र बुधवारी सकाळच्या सुमारास दोन अज्ञात मारेकर्यांनी एका व्यक्तीवर चाकूने वार केले व ते वार चुकवण्यासाठी त्याने धावपळ केले. पण त्याचा पाठलाग करून मारेकऱ्याने त्याच्या मानेवर पाठीवर पोटात असे नको त्या ठिकाणी नऊ दहा वार करत त्याचे जीवन संपविले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे .व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृत व्यक्तीचे नाव अमोल भुजबळ असे असुन ,अमोल हा एका खाजगी रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. अमोल बुधवारी काही सामान आणण्यासाठी गणेश नगर वाय पॉईंट येथे स्कुटी वरती आला असता अज्ञात व्यक्तीने काळया रुमालाने तोंड बांधून तर दुसऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालून बेसावध असलेल्या अमोल वरती अचानक वार करण्यास सुरुवात केली त्यात रक्त भांबाळ झालेला अमोल जागीच ठार झाला व मारेकरी तेथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव पोलीस उपअधीक्षक सुशील कुमार नाईक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह शिवाजीनगर चे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. हि घटना जुन्या काही वादातून घडल्याची माहिती आहे.
Discussion about this post