एकेकाळी सामाजिक व राजकीय लढाईमध्ये देशात अग्रेसर असणारा महाराष्ट्र अथवा दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र, मराठी माणूस आज पिछाडीवर पडल्याचे दिसून येत आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाने आम्ही मुंबई महाराष्ट्रात राखली, परंतु आज मुंबईमध्ये मराठी भाषा, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी माणसाला झगडावे लागत आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक क्षेत्रात झालेली मराठी माणसाची पीछेहाट. केवळ नोकरीची मानसिकता ठेवल्याने मुंबई मध्ये परवडत नाही म्हणून बदलापूर, विरार पलीकडे मराठी कुटुंबे फेकली जात आहेत.
परंतु आता काळ बदलला आहे.सर्व समाज जरी सुशिक्षित झाला असला तरी पुढील पिढ्याना नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. देशात नव्हे जगभर बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे नोकरीची मानसिकता संपवून आपल्यामध्ये उद्योजगीय प्रेरणा वाढण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यासाठी आज जर हे संस्कार आपण आपल्यावर व पुढील पिढ्यावर निर्माण करू शकलो तर पुढे 20-25 वर्षात आपल्याकडे मोठे उद्योगपती निर्माण होऊ शकतील.
या दृष्टीने आजच्या विविध उद्योगपतींचा आदर्श आपल्यावर व पुढील पिढ्यावर होणे आवश्यक आहे. टाटा कुटुंब हे उद्योजगीय धडाडी, नीतिमत्ता व सामाजिक भान व एकूणच सामाजिक विश्वस्त म्हणून आपल्यापुढे आदर्श आहेत.
तेव्हा प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे 5 भागाचे व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यामध्ये जमशेदजी, दोराब व रतन, जे आर डी व शेवटी रतन टाटा या टाटा परिवारातील उद्योग महर्षीचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अंगाने अभ्यास करणार आहोत.
वक्ते -आयु. मनेष जाधव (Sr. Manager RCF)
वेळ :- 28/02/25 सायं 7.00.
स्थळ :- सम्राट अशोक बुद्ध विहार आर सी एफ कॉलनी
चेंबूर मुंबई 71
हे व्याख्यान ऐकण्या करिता अनेक मंडळी आली होती. सम्राट बुद्ध विहारात सर्व सभासद व पदाधिकारी, कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते. तसेच कमिटी मेंबर आणि दिवा (ठाणे) मधून मा. रमेश तांबे, मा. प्रशांत घाडगे तसेच मा. भीमश्री संजय मोरे (सर) यांची ही उपस्थिती होती.
सदर व्याख्यान झाल्यानंतर मा. संजय मोरे सरांनी या वर आपले मत व दृष्टिकोन मांडला. भारतीय इतिहास सनातन, धर्म, द्वेष, जातीभेद सर्व ठिकाणी आहेत. शाळेत या गोष्टींचे अनुकरण करण्यासाठी अभ्यास क्रमात ही रचना केलेली आहे या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्यानंतर ते तसे अनुकरण करू लागतात.
विज्ञान दिनानिमित्त आज या ठिकाणी जमसेद टाटा यांचे जीवन चरित्र सांगण्यात आले. येणाऱ्या काळात अजुन नविन जमशेद टाटा सारखे उधोजक बनावेत सामन्याच्या घरातील मूळ ही उद्योजक व्हावेत हा दृष्टीकोन समोर ठेवून या विहारात उपक्रम हे चालु करण्यात आलेले आहेत.
या प्रमाणेच सर्व विहारात ही अशा प्रकारची व्याख्याने होणे गरजेचे आहे असे त्यांचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले….. त्याबद्दल आभार ही मांडले.
आपले नम्र
Discussion about this post