वार्ताहर: दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी धानोरे येथील आदर्श व उपक्रमशील जि.प.प्राथमिक दिघेवस्ती शाळेत विज्ञानाच्या फायद्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री. प्रभाकर शिंदे सर यांनी विज्ञानाचा नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक
श्री. प्रभाकर शिंदे सर यांनी अंधश्रद्धा व विज्ञान याबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक उदाहरणाद्वारे जागरूकता निर्माण केली. श्री. राजेंद्र बोकंद सर व श्री. सोमनाथ अनाप सर यांनी सी.व्ही. रामन यांचे महान कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी वैज्ञानिक उपकरणे तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .विविध संशोधक व त्यांच्या शोधांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, मुख्याध्यापक श्री. प्रभाकर शिंदे सर, श्री. राजेंद्र बोकंद सर, श्रीम. विद्याताई उदावंत मॅडम, श्रीम. सुनिता ताजणे मॅडम, श्रीम. मनिषा शिंदे मॅडम, श्रीम. सरगम मोटे मॅडम व श्री. सोमनाथ अनाप सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Discussion about this post