आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…
मार्गदर्शक – श्री. ए.बी. दिवटेसर
आजरा: तालुका प्रतिनिधी,
आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल, महागोंड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना श्री. दिवटेसर म्हणाले विज्ञान दिनाचे महत्व काय ते कशासाठी साजरा करतात त्याचे विश्लेषण म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व काय?
राष्ट्रीय विज्ञान दिवस हा दिवस विज्ञानाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. विज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन संशोधनामुळे प्रगती होत आहे. विज्ञानाची गोडी लावून नवीन संशोधनाची निर्मिती करणे, नवीन संशोधन उदयास येणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
विज्ञान शिक्षणाचा प्रसार
२८ फेब्रुवारी हा दिवस शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळते. विविध विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करणे. विज्ञानसंबंधी स्पर्धांचे आयोजन केले जाते. विज्ञानात रुची निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रम राबविले जाताता.
सी. व्ही. रामन यांचा सन्मान
28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी सी. व्ही. रामन यांच्या शोधाचे महत्त्व आणि त्यांच्या योगदानाचे सन्मान केले जाते. त्यांच्या ‘रामन प्रभाव’च्या शोधामुळे भारताला एक वैज्ञानिक शक्ती म्हणून ओळख मिळाली. त्याअनुषंगाने सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे शाळा, महाविद्यालायात पूजन होते. त्यांच्या शोधाचे स्मरण करून नवीन काही तरी निर्माण करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी, त्यासाठी विज्ञान दिवस साजरा केला जातो.
इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके तयार केली तसेच विविध प्रकारचे मॉडेल टाकावू पासून टिकावू असे प्रयोग सादर केले त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला, विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा प्रयोग प्रदर्शन यामध्ये सहभाग विद्यार्थांना भेट स्वरूपात बक्षिस देणेत आले.
या कार्यक्रमाचे वेळी शाळेचे मुख्याध्यापक, दिपक कांबळेसर यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले त्याच प्रमाणे प्रताप देसाईसर, सौं. संजिवनी खराडे मॅडम, पाटीलसर, तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post