विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

राळेगाव येथील शिवाजी नगर प्रभाग क्रमांक १३ मध्ये आज सकाळी ९ वाजता लागलेल्या भीषण आगीत श्री. श्याम लक्ष्मणराव परचाके यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील संपूर्ण साहित्य, धान्य, कपडे आणि भांडीही नष्ट झाली. परचाके कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. कुटुंबाच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन सात हजार रुपये रोख मदत प्रदान करण्यात आली. या मदतीसाठी नगरसेविका अश्विनीताई प्रदीपराव लोहकरे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगाव, राजू दुधपोळे, अंकित कटारीया यांनी सहकार्य केले. या प्रसंगी नगरसेवक मंगेश राऊत, माजी नगरसेवक प्रदीप लोहकरे, कृ. उ. बा. राळेगावचे संचालक अंकित कटारीया, नितीन कोमेरवार, सय्यद लियाकत अली, संजय दुरबुडे, मनोज पेंदोर, अंकुश वड्डे, तलाठी सौरभ तुमस्कर, अविनाश पेंदोर तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची नोंद घेतली असून प्रशासनाच्या वतीने अधिक मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
Discussion about this post