चिपळूण : ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूण आणि श्री हॉस्पिटल,चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन गुरुवार दि.२७ फेब्रुवारी रोजी श्री हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते.यावेळी मंचावर संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी,श्री हॉस्पिटलचे डॉ.अभिजित आणि डॉ.रश्मी सावंत,डॉ.वैभव जाधव आणि प्रमुख पाहुण्या म्हणून तालुका आरोग्य अधिकारी मा.ज्योती यादव व पोलीस उपनिरीक्षक अनुराधा मेहेर उपस्थित होत्या. बांगी यांनी सर्वांचे पुष्गुच्छ आणि गुलाबुष्प देऊन स्वागत केले.नंतर मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून आणि फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.नंतर बांगी यांनी प्रास्ताविक केले.ज्योती यादव आणि अनुराधा मेहेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ.अभिजित सावंत आणि डॉ.वैभव जाधव यांनी आपले विचार मांडले.
त्यानंतर श्री हॉस्पिटल कडून सर्वांना कॉफी आणि बिस्किटे देण्यात आली.त्यानंतर प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली.सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमने अत्यंत आपुलकीने प्रत्येकाची तपासणी करून उपचार केले.यामध्ये रक्तदाब,मधुमेह,रक्त तपासणी आणि आवश्यक वाटले तेथे ईसीजी आणि एक्सरे काढला,सोनोग्राफी केली.दम लागणे आणि हाडांच्या समस्या याबाबतही तपासणी केली.महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.ज्यांचे रक्तगट काढलेले नव्हते,त्यांना ते काढून दिले.एकूण ६० सभासदांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
सुसज्ज अशा श्री हॉस्पिटल मध्ये संयोजकांनी तपासणीसाठी उत्तम व्यवस्था केली होती.संघाचे अध्यक्ष उस्मान बांगी यांनीसर्वांचे आभार मानले.हे शिबीर यशस्वी होण्यासाठी संघाचे उपाध्यक्ष सुरेश जाधव, सचिव रत्नमाला कळंबटे,कोषाध्यक्ष विजय बापट,उदय वेल्हाळ, लक्ष्मण कांबळे,बजरंग दाभोळे,माधवी भागवत,सौ.नीला पेंडसे,मंजिरी नरवणे,नंदकुमार तांबे,दिलीप पाटील,मधुकर तेरेदेसाई, अ.गनी वनकर यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post