प्रतिनिधी:- प्रदीप सोनवणे
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांसह नागरिक आक्रमक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलींची काही ट वाळ खोरानी यात्रेदरम्यान छेडछाड करण्याचा प्रकार घडला असुन या प्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी टाळखुरोच्या अटकेसाठी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्ते सह नागरिकांनी ठिय्या मांडला आहे नुकत्याच समोर आलेल्या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पवित्रा घेतला एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड काढल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा जमाव पहावयास मिळत आहे यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आमच्यासारख्यांच्या जर मुली सुरक्षित नसते तर गरिबांच्या काय असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलेला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की दरवर्षीप्रमाणे कोथळी गावामध्ये येथे मुक्ताबाईची यात्रा भरत असते माझी मुलगी ही शुक्रवारी यात्रेत गेले असता तिचे काही टवाळ पोरांकडून शेड काढण्याचा प्रयत्न झाला तसेच आपण मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आले असल्याचे माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई यांनी माध्यमांना बोलताना सांगितले
प्रतिनिधी प्रदीप सोनवणे
9604030355
Discussion about this post