सारथी महाराष्ट्राचा (जिल्हा प्रतिनिधी) अनिल डाहेलकर
(मुर्तीजापुर) मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटी,छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने रामानुजन कॉम्पिटिशन ऑफ मॅथेमॅटिक्स नॉलेज (आर.सी.एम.के.) 2024 25 ही स्पर्धा गणित विषयातील आवड व गती निर्माण करण्यासाठी दरवर्षी आयोजित केली जाते. महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती पर्वावर सदर परीक्षा महाराष्ट्रातील सहा केंद्रावर आयोजित केली जाते.यामध्ये श्री.डॉ.आर. जी. राठोड कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मुक्ता सुनील मोरे हिला विज्ञान पारंगत (गणित) गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
सदर परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 ला श्री.डॉ.आर.जी. राठोड कला व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झाली होती यावेळी महाविद्यालयातील प्रा.ए.ओ.ढोरे यांनी मुर्तीजापुर केंद्रावरील समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळला होता. मागील वर्षी सुद्धा याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती सतीश वाघ हिने विज्ञान स्नातक गटातून प्रथम क्रमांक मिळवला होता हे विशेष. यावेळी गणित विभाग प्रमुख डॉ.ए.एस. निमकर,प्रा.ए.ओ.ढोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. चर्जन यांनी कु. मुक्ता सुनील मोरे हिचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच श्री. गो.राठोड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.ए.आर राठोड व संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती दमयंतीबाई राठोड यांनीही तिचे अभिनंदन व कौतुक केले.
Discussion about this post