विदेशात शिक्षणासाठी किंवा पर्यटक म्हणून अथवा व्यवसायासाठी जायचे म्हणले की एक कागदपत्र अनिवार्य आहे, ते म्हणजे ‘भारतीय पासपोर्ट’.
यावर्षी शासनाने पासपोर्ट नियमांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. नवीन नियमानुसार, ०१ ऑक्टोबर २०२३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी ‘जन्म प्रमाणपत्र’ हा जन्मतारखेचा एकमेव अधिकृत पुरावा असेल. पासपोर्ट नियम १९८० मध्ये करण्यात आलेल्या या सुधारणा अधिकृत राजपत्रात प्रदर्शित झाल्यानंतर लागू करण्यात आल्या आहेत.
सरकारच्या या सुधारणांचा मुख्य उद्देश पासपोर्ट अर्ज प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करणे आहे. बनावट कागदपत्रांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. तसेच ज्यांचा जन्म ०१ ऑक्टोबर २०२३ पूर्वी झाला आहे अशांसाठी आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला हे पर्यायी कागदपत्र आहेत.
भारतात, पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केला जातो. यासाठी २६ पासपोर्ट कार्यालये आहेत. तेथे जाऊन पासपोर्टसाठी अर्ज करावा लागतो. किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरबसल्या ऑनलाईन ही अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोअर मधून ‘एम पासपोर्ट’ नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल त्यानंतर मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून साइन अप करावे.
Discussion about this post