आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
अंबाजोगाई – अंबाजोगाई येथील कृषि तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह इमारतींसाठी तब्बल तीस कोटी रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी दोन कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कृषि तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांन निवासासाठी चांगली इमारत असावी यासाठी आ. नमिता मुंदडा प्रयत्नशील होत्या. वसतिगृह इमारती बांधण्याकरिता निधी मिळविण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांचा सातत्यपूर्ण आग्रह आणि पत्रव्यवहार लक्षात घेऊन शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह इमारतींसाठी प्रत्येकी १४ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. यापैकी प्रत्येकी एक कोटी असा एकूण दोन कोटींचा निधी वितरीत करण्यास शासंनाने गुरुवारी (दि.२७) मंजुरी दिली आहे. या शासन निर्णयामुळे अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम सुविधा मिळणार आहेत. दरम्यान, अंबाजोगाईमध्ये कृषि क्षेत्राच्या सुधारणा, तंत्रज्ञानाचा विकास आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाचे विशेष लक्ष आहे.
कृषी शिक्षणाच्या विकासासाठी शासनाने भांडवली निधी मंजूर करत संबंधित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासनाने मंजूर केलेला हा निधी वेळेत वितरित करून कामे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार आहे. नवीन वसतिगृह इमारती उभारल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. हे काम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे कृषि शिक्षणाच्या दर्जामध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करत वसतिगृहासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, ना. पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
Discussion about this post