
ॲटलास इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कराड चे संस्थापक व मार्गदर्शक श्री विकास भोसले सर हे अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सर्वसमावेशक वृत्ती तसेच त्यांचा व्यवस्थापन कौशल्याची दखल घेत मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर ए. एम. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने गौरवण्यात आले. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्स , यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, तसेच मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद बायोमेक इंडिया चे औचित साधून डॉक्टर जी.आर.पठाडे, अधिष्ठता, के आय ए एस , के व्ही व्ही डी यु, कराड , यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला..
Discussion about this post