


गंगापूर प्रतिनिधी,
सुनील झिंजुर्डे पाटील..
गंगापूर वैजापूर रोडवरील वरखेड शिवारामध्ये पहाटे आज्ञात दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबांना मारहाण करुन गंभीर जखमी केले रोख रक्कम सोने-चांदी व टरबुजाच्या वाढीचे नुकसान करत फरार झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना गंगापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार २ व ३ मार्चच्या मध्यरात्री अंदाजे तीन वाजे दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी गंगापुर वैजापुर रोडवरील नरहरी रांजनगाव फाट्या समोर वरखेड शिवारात चोदा मैल जवळ औटे यांच्या शेतवस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकुन शेतकरी अशोक भानुदास औटे वय (५५) मुलगा गणेश अशोक औटे वय ४०, सुन सोनाली गणेश औटे वय ३५ व नातु रुद्रा गणेश औटे वय १४ यांना गंभीर मारहाण करत जखमी केले व घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. जाताजाता त्यांच्या टरबुजाच्या वाडीचे अतोनात नुकसान केले. तसेच तुम्ही जर उठले तर तुम्हाला मारून टाकू असे धमकी देत व मोबाईल शेतात नेऊन फेकून दिले गंभीर जखमी झाल्याने औटे कुटुंब झोपूनच राहिले होते. सकाळी नातु रुद्र याने घराच्या बाजूला मोबाईल सापडून आणले त्यानंतर त्यांनी ११२ ला कॉल केला. परंतु पोलीस सकाळी दहा वाजेपर्यंत आले नाही यामुळे पोलिसा विषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या सर्व जखमींना गंगापूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले केले.१० वाजता शिल्लेगाव पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी रुग्णालयात येऊन जखमींची भेट घेवुन विचारपुस केली. यामध्ये गणेश औटे हे गंभिर जखमी आहेत. पुढील प्रक्रिया पोलिस करत आहे..
Discussion about this post