पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
शिधापत्रिका धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, आता आपल्याला रेशन कार्ड ची ई केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाण्याची गरज नाही. रेशन साठी ‘केवायसी’ घरबसल्या मोबाईलवरच करता येणार आहे. शासनाने मेरा केवायसी ॲप (mera kyc app) लॉन्च केले आहे.
यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर मधून ‘मेरा केवायसी ॲप’ व ‘आधार फेस आरडी’ ही दोन अप्लिकेशन्स डाऊनलोड करावी लागतील. यासोबतच आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे ही गरजेचे आहे.
मेरा केवायसी ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रथम आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे त्यानंतर आपला आधार नंबर टाकावा,आधार नंबर टाकल्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल; तो ओटीपी सबमिट करावा. ओटीपी सबमिट केल्यानंतर फेस ऑथेंटीकेशन साठी आपला चेहरा दाखवावा.
अशाप्रकारे, आपण आपली, व आपल्या कुटुंबाची रेशन कार्ड ‘ई-केवायसी’ घरबसल्या करू शकता.


Discussion about this post