
३४३ रुग्णांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ – पुढील शिबिर १० मार्चला
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान व वैद्यकीय माहिती सेवा केंद्र यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये हृदयरोग, कर्करोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, ऑर्थोपेडिक, डायबेटिस व हायपरटेन्शन आदी आजारांवर विशेषज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला सेवा देण्यात आली. शिबिरासाठी आशा हॉस्पिटल व शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांचा मोलाचा पाठिंबा लाभला. गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळावा यासाठी १० मार्चला आणखी एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे सहभागी नागरिकांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी, महेश बाँड,अरुण सावरकर, ऍडव्होकेट देवेंद्र नक्षिने, व्यवस्थापक श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, केशव फुलझेले , विश्वस्त अजायविजय वर्गीय दत्तू समरित्कर, केशव महाराज फुलझेले, श्री बागरे जी, गणेश राऊत, मिलिंद गाडेकर, देविदास फुलझेले, शरद जाधव, नरेंद्र झोड, नरेंद्र धनुले, सरपंच कोराडी, तसेच महादुळा नगरीचे मां, नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी भेट दिली आणि संस्थान चे कार्याची प्रशंसा केली असा हॉस्पिटल कामठी ची सर्व टीम डॉक्टर सौरभ अग्रवाल यांचे नेतृत्वात काम करतांना दिसत होती..
Discussion about this post