मुक्ती संघर्ष समितीची विविध मागण्या संदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक
आजरा नगरपंचायत, पाटबंधारे तसेच विज विभागाचे अधिकारी उपस्थित..
आजराः तालुका प्रतिनिधी,
आजरा :-भारत नगर मधील मूलभूत व पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी “संघर्ष मोर्चा “चे नियोजन होते परंतु रमजानच्या पवित्र महिन्याला डोळ्यासमोर ठेऊन तसेच या पवित्र महिन्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कायद्याचा व पोलिसप्रशासनाच्या विनंतीस मान राखत संघर्ष मोर्चा रद्द करण्यात आला व पोलीसप्रशासनाच्या मध्यस्थीने आजरा नगर पंचायत, विज विभाग तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भारत नगरमधील विविध समस्या, पायाभूत सुविधा तसेच विजकनेक्शनसाठी फिडर, पथदिवे बस्वाण्यासाठी सकारात्मक चर्चा घडून आली.
भारतीय संविधानाच्या कलम 243W मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल सांगितले आहे. या कलमाद्वारे नगर पंचायतीना स्थानिक पातळीवार विविध सेवांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. ज्यात सांडपाणी, कलम 252(2)मध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे बांधील आहे. परंतु गेली 27वर्षे भारत नगर वसाहत या सर्व सुविधापासून वंचित आहे. यासाठी मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या क्रमप्राप्त साखळीने संघर्ष सुरु केला आहे. याअगोदर निवेदने देण्यात आली. कोणतीही हालचाल न झाल्यामुळे “संघर्ष मोर्चा “काढण्याचे नियोजन होते परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत “संघर्ष मोर्चा “रद्द करून पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा सत्राची बैठक नगरपंचायत सभागृहात घेण्यात आली. या चर्चेमध्ये मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी प्रश्नांचा भडीमार करीत भांबेरी उडवली. त्यांनी म्हटले कि, राजकारण महत्वाचे पण लोकांचे जीवनमान महत्वाचे नाही असं वाटतंय. आजऱ्यातील अशा आठ गटारी आहेत ज्या गटारीतून पाणी निचरा होणार नाही. त्यामुळे जो हेतू आहे ते साध्य होत नसेल तर काम करून फायदा काय? गटर आधी कि रस्ता आधी? असाही प्रश्न विचारला. ठेकेदाराकडून व्यवस्थित व चांगल्या दर्जाचे काम करून घेणेबाबत तसेच भारत नगरमधील स्थळ पाहणी करण्याची आग्रही मागणी केली त्यामुळे तातडीने स्थळ पाहणी करून प्रश्न सोडवण्यासाठीची हमी सर्व अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार कामाचा उरक करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी राकेश चौगले, पाटबंधारे विभागचे सहा. अभियंता ए. एस. कचरे, कनिष्ठ अभियंता पी. बी. सुर्वे, विज विभागचे आजरा ग्रुप 1चे अभियंता निखिल मोगरे, पोलीस कर्मचारी तसेच भारत नगरमधील यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते दिंगबर विटेकरी,भारतनगर मधील तौफिक माणगावकर, सल्लाउद्दीन शेख, मकसूद माणगावकर,खुदबूद्दीन तगारे, गुलाब शिकलगार,पापा लतीफ,सलीम नाईकवडे, आसिफ मुजावर,मुदस्सर इंचनाळकर, अब्दुलवाहिद सोनेखान सलीम शेख(सर),यासीन सय्यद(सर ), नईम नाईकवडे, शौकत पठाण, आसिफ मुराद,सलीम ढालाईत, रहुफ नसरदी,सल्लाउद्दीन नसरदी,मोईन शेख,मुबारक नसरदी, आसिफ काकतीकर,कासिम लतीफ, मोहम्मद नसरदी,फहीम नसरदी, रहीम लतीफ, रशीद लाडजी,मुफीद काकतीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post