
जळगाव :
वडील रात्री कामावर निघून गेल्यानन्तर घरी एकट्याच असणाऱ्या एका १८ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिकेत विजय मौर्य (वय-१८, रा. उत्तर प्रदेश ह.मु. सुप्रीम कॉलनी) असे या मुलाचे नाव आहे . त्याने का आत्महत्या केली हे स्पष्ट होऊ शकले नाही.
उत्तरप्रदेशातील विजय मौर्य हे मुलगा अनिकेत सोबत रोजगारासाठी जळगावात आले होते. एमआयडीसीतील एका चटई कंपनीत दोघ बापलेक काम करुन आपला उदनिर्वाह करीत होते, त्यांनी सुप्रीम कॉलनीत एक खोली भाड्याने घेतलेली होती. शुक्रवारी दोघांची रात्रपाळी ड्युटी होती. त्याचे वडील हे रात्री कंपनीत ड्युटीवर निघून गेले तर अनिकेत हा घरी एकटाच होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याचे राहत्या खोलीमध्ये गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
घटनेची माहिती मिळताच पोहेकों गफूर तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला, तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणीपोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करणयात आली आहे..
Discussion about this post