प्रतिनिधी. शेख.अनिस
तामसा.
हदगाव :
तालुक्यातील दत्त पिपळगाव येथील दत्त मंदिर देवस्थानच्या वतीने दि.६ तें १२ मार्चदरम्यान महाशिवपुराण कथा सप्ताह साजरा होणार आहे. या कथेची जय्यत तयारी झाली असून देशभरातून हजारो संत, मंहत, धर्माचार्य उपस्थित राहणार आहेत तसेच २०० एकरवर भव्य मंडप उभारण्यात आला आहे अशी माहिती मुख्य पुजारी श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिली रोज लाखो भाविक कथेसाठी येतील, कुणीही प्लास्टिक वस्तू आणू नयेत. गर्दी टाळण्यासाठी कोणतेही दुकान लागणार नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे साधू संतासाठी संत कुटीर स्थान बांधले आहे. यासाठी भक्त भगवान निरगुंडे यांनी मोठे योगदान दिले आहे. ही कथा उत्तर प्रदेशातील वूदावन धाम येथील श्री राजेंद्र दास देवाचार्य महाराज सादर करणार आहेत दि.६ मार्च रोजी शोभायात्रा निघणार असून दुपारी १२ तें ४ या वेळेत शिवमहापुराण कथा सादर होणार आहे.१२ मार्च पर्यंत रोज सकाळी ४ तें ६ काकडा भजन,सकाळी ७ तें १० गुरु चरित्र, श्री ज्ञानेशवंरी ११ तें ४,रात्री ८ तें १० किर्तन होणार आहे. या कथेसाठी देशाच्या विविध भागातून हजारो संत महंत येणार असून १५ एकरमध्ये भाविकासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कथेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बागेशवर धाम सरकार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, खा.अशोक चव्हाण,ना हेमंत पाटील, आ. बाबुराव कदम कोळीकर,माजी खा सुभाष वानखेडे,माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हा अधिकारी, तहसीलदार, तलाठी संजय वानोळे उपस्थित राहणार आहेत. आरोग्य विभागाकडून आणीबाणीच्या परिस्थितीत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी १० हजारावर पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही प्लास्टिकचा वापर करण्यात येणार नाही. जेवणासाठी स्टील प्लेट, स्टील ग्लास,पाणी पिण्यासाठी बाटल्याची व्यवस्था करण्यात आली आहे. माझ्या शेतकरी,कामगार, मजूर, वर्गणीदार, दानशुरांनी केलेल्या सहकार्यातून हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडणार आहे, असेही श्री दत्त मंदिराचे प्रमुख श्री बाल योगी व्यंकट स्वामी महाराज यांनी सांगितले आहे….
Discussion about this post