

महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त 02 मार्च 2025 रोजी डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत संपूर्ण देशामध्ये महास्वच्छता अभियान पार पडले.त्याचप्रमाणे तळेरे येथील बसस्थानक परिसरात ही स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी श्री समर्थ बैठक तळेरे येथील 106 सदस्य अभियानामध्ये सहभागी झाले होते. सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बस स्थानक परिसरातील ओला व सुका असा एकूण 2.5 टन कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
अशा प्रकारे प्रतिष्ठान मार्फत निस्वार्थ आणि शिस्तबद्धपणे स्वच्छता अभियान राबवल्याबद्दल तळेरे बस स्थानकातील अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिष्ठानचे व श्री सदस्यांचे आभार मानले व आपल्या बस स्थानकाची तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवणे व आपला गाव, राष्ट्र व देश कचरा मुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्नशील राहने गरजेचे आहे असे बोलून श्री सदस्यांचे व प्रतिष्ठानचे देखील कौतुक केले.
या स्वच्छता अभियानासाठी तळेरे गावचे सरपंच.श्री .हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ. रिया चव्हाण आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post