
उमरगा :
तालुक्यातील शेतकरी सेनेच्या वतीने शेतकरी व महीलांच्या मागण्याचे निवेदन सोमवारी (ता. तीन) रोजी तहसिलदार यांना देण्यात आले.
निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा, सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सौर कृषी पंप मंजुर करण्यात यावेत, रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ चालू करण्यात याव्यात, ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान अनेक वर्षापासून प्रलंबित असून ते तात्काळ देण्यात यावेत, कृषी विभागाअंतर्गत अनुदानावर वाटप करण्यात येणारे बी बियाणे व औषधे हे ठेकेदारामार्फत खरेदी न करता शेतकऱ्यांना स्वतः खरेदी करण्याची परवानगी द्यावी, शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज ही दिवसा १२ तास देण्यात यावी, तालुक्यातील मंजुर झालेले वीज सबस्टेशनचे काम तात्काळ चालू करण्यात यावे, शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासोबतच सिंगल डीपी ची योजना तात्काळ चालू करून देण्यात यावी, शासकीय हमीभाव केंद्रामार्फत ज्या जाचक अटी आहेत उदा. ओटीपी व ई पिक पाहणी इ. रद्द करण्यात यावे., ज्या शेतकऱ्यांचा माल हमी भाव केंद्राने खरेदी केलेला नाही त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला त्वरीत देण्यात यावा, २०२० ते २०२५ या काळातील विमा व अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे, दशलक्ष विहिर अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे, शेतकरी शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा, खताचे अनुदान कमी केल्यामुळे वाढीव भावाने दिले जाणारे खत हे तात्काळ कमी करून पूर्ववत अनुदानाप्रमाणे चालू ठेवावे, लाडकी बहिण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा व जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक स्थापन करण्यात यावा, निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महाविद्यालयीन मुलींच्या फीमध्ये सवलत मिळावी आदी मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनावर
शेतकरी सेना जिल्हाप्रमुख.विजयकुमार नागणे,मा.सभापती रणधीर पवार,मा.नगराध्यक्ष रजाक अत्तार,विधानसभा अध्यक्ष भगवान जाधव,शिवसेना तालुका उपप्रमुख सुधाकर पाटील,शेतकरी तालुका प्रमुख.विजयकूमार तळभोगे,जेष्ठ शिवसैनिक महाविर कोराळे,डि.के.माने,मारूती थोरे,महेश शिंदे ,संतोष जाधव,गोपाल शिंदे,धिरज बेंलबकर,आण्णाराव माने,दिलीप जोशी,हणमंत सुरवसे,शिवकांत पतगे,
आदि शिवसैनिक उपस्थित होते..
Discussion about this post