

. प्रा एम एम सुरनार
आज दिनांक 03/03/25 वार सोमवार श्री पी एम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्नाथ नगर गंगाखेड येथे प्रचलित शिक्षण पद्धती व पालकांची भूमिका या विषयावर पालक आणि विध्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा एम एम सुरनार सर यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेतील विध्यार्थी आणि बराच पालक वर्ग उपस्तिथ होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन आणि उपस्थित मान्यवरांचे सत्कार झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सक्रिय शिक्षक मंगनाळे सर यांनी केले.पुढे प्रबोधन चळवळीचे व्याख्याते प्रा सुरनर सर यांनी आजची शिक्षण पद्धती आणि या पूर्वीची शिक्षण पद्धती यातील मूलभूत फरक समजावत पूर्वी साधने कमी होती परंतु शिक्षणाची हमी होती आज साधने मुबालक आहेत पण शिक्षणाची कमी आहे असे सांगत महामानवाला अभिप्रेत आजची शिक्षण पद्धती नसून मानवी मूल्य पायदळी तुडवत आहे. आणि विध्यार्थी हा यंत्रासारखा बनत असून शिक्षण हे मानवी उधाराचे महान अस्त्र असून त्याचा वापर आज लोक सर्रास पोट भरण्यासाठी करत असून समाज आणि देशहिताचे विचार लोप पावताना दिसत असल्याचे प्रा सुरणार म्हणाले पुढे त्यांनी अनेक शिक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ अमेरिकन शोधक आणि जनरल इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनचे संस्थापक थॉमस एडिसन (१८४७-१९३१) हे ९९९ वेळा कार्यरत विजेचा दिवा बनवण्यात अयशस्वी झाले, हे प्रसिद्ध आहे, परंतु त्यांच्या १००० व्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. कोणत्याही अंतिम यशात चिकाटी किती महत्त्वाची भूमिका बजावते हे दाखवण्यासाठी त्यांनी कदाचित ही कथा रचली असावी.
यांची दाखले आणि उधारणे देत जगाच्या कल्याणसाठी आपला आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे असे प्रतिपादन प्रा सुरनार सर यांनी केले.
मराठी शाळा टिकल्या तरच गरिबांचे मुले शिकतील असेही बोलताना त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय ऊर्जादायी असून ते आजच्या विदयार्थ्यांना प्रेरणादायी ठरेलं असे त्यांनी सांगितले. कार्यकर्माचे अध्यक्ष सौं मुंढे मॅडम मुख्याध्यापक लटपटे सर अंधोरीकर मॅडम केंदळे सर मंगनाळे सर आणि लटपटे सर व राजकुमार सुळे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंगनाळे सरांनी केले तर आभार राजकुमार सुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुखाद्यापक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थांनी परिश्रम घेतले..
Discussion about this post