पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जनकल्याण यात्रा २०२५ चा शुभारंभ २ मार्च रोजी विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी येथे करण्यात आला.
जनकल्याण यात्रा राज्यात पुढील पंधरा दिवस सुरू राहणार असून; राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये मोबाईल एलईडी व्हॅन द्वारे विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येणार आहे.
या यात्रेदरम्यान राज्यातील विविध गावात जाऊन माहितीपर चित्रपटाद्वारे योजनांची जनजागृती करण्यात येईल, व लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. या माहितीपटाची निर्मिती व दिग्दर्शन शंकर बारवे यांनी केले आहे.
समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष साहाय्य विभाग कार्यरत असून या योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे. तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी मंत्री झिरवाळ यांनी केले.
Discussion about this post