तालुका प्रतिनिधी
शरद गोभे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात आज दि. ३ मार्च २०२५ रोजी शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आज रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्या करण्यात आल्या.
१. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी कधी होणार?
२. कापसाला दहा हजार रुपये हमीभाव कधी देणार ?
३. सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव कधी देणार?
४. शेतकऱ्याची बंद केलेली विद्युत कनेक्शन कधी चालू करणार?
यावेळी महागाव तालुक्यात नागपूर- तुळजापूर हायवे वर 2 तास रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे हायवेवर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, विधानसभा प्रमुख भिमराव भालेराव, तालुकाप्रमुख रवींद्र भारती, युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, युवती सेना जिल्हाप्रमुख मंजूषा वानखेडे, तालुका संघटिका उज्वला ठाकरे युवासेना तालुकाप्रमुख सुशील गावंडे, युवती सेना उपतालुकाप्रमुख रेखा बोरकर, अरुणा चौधरी, शहर समन्वयक नितीन नरवाडे, प्रसिद्धीप्रमुख सुमित गोविंदवाड, तालुका संघटक संतोष मोरे, उपतालुका संघटक अंकुश आडे, उपतालुका प्रमुख कैलास पाटील, ज्ञानेश्वर पानपट्टे, अविनाश राठोड, प्रवीण भांगे, आकाश राठोड, सोबतच विभाग प्रमुख अनंता जोतरकर, कृष्णा इंगळे, विलास फाळके, शाखाप्रमुख प्रभाकर पांगरकर, सुनील कदम, दत्तराव तळणकर, सुधाकर ठाकरे, दत्ता राठोड ( खली ) गजानन कोरडे, दामाजी मेंडके, साहेबराव सातपुते, राजू सलगर, मुकेश कदम, किरण जामकर, प्रमोद वानखेडे युवासेनेचे ओम कुसंगवार शंकर टेटर, ऋषिकेश बलखंडे प्रवीण कोकरे, इत्यादी शेकडो शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.



Discussion about this post