हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयपर्यंत मूक मोर्चा
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक अहर्ता करणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार असलेल्या लाखो तरुण-तरुणींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय सेवेमध्ये सहा महिने कालावधीसाठी नियुक्त केले होते मात्र या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षनार्थीचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे त्यामुळे हजारोंच्या संख्येने युवक युवतींना घरी बसवावे लागणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील सातही जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ यांनी एल्गार पुकारला असून आज छत्रपती संभाजीनगर शहरातील आमखास मैदान येथून भव्य मूक मोर्चा काढून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यासाठी मुक मोर्चा अध्यक्ष वर्षा लहाने, स्वाती देशमुख, सायली खरात, प्रियंका बोरुडे, कल्याणी काळे, बाळकृष्ण हुड ,अमोल गायकवाड , राजेंद्र नवले ,सुनील खंडागळे ,प्रशांत निकम , इम्रान शेख , राम शिंदे , अक्रम पटेल ,वैभव सावकार , विजय राठोड , ईश्वर वारगणे ,आणि संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
Discussion about this post