
रवि यादव,
शिराळा /प्रतिनिधी..
शिराळा तालुक्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे जलाशयातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. यामुळे ४९ पैकी १० पाझर तलाव कोरडे पडले आहेत; त्यामुळे या परिसरातील जनावरांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. करमाळे नंबर १ व पाचुंब्री तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ४७ तलावांपैकी हत्तेगाव येथील तलावात ९५ टक्के पाणीसाठा असून, १० तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. २ तलावांत ९०, एका तलावात ८५, तर ३ तलावांत ५० टक्के पाणीसाठा आहे.
उन्हाची दाहकता वाढू लागल्याने धरण, विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. मार्चअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीपातळी घटणार असून पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे.
तलावाचे नाव व कंसात पाणीसाठा : टक्केवारी अशी
हत्तेगाव (९५), प.त. शिराळा नंबर १, पाडळी (९०), खिरवडे (८५), भटवाडी, वाडीभागाई बिऊर (७५), वाकुर्डे बुद्रुक जमदाड कुरण, बादेवादी वाकुर्डे बुद्रुक, अंत्री खुर्द, निगडी महारदरा, कापरी, तडवळे नंबर १ (७० ), गवळेवाडी उंदीर खोरा, गवळेवाडी बहिरखोरा, वाकुर्डे खुर्द, पाडळेवाडी (६५), औंढी (५५ ),शिरसटवाडी, खेड, रेड क्रमांक २ (५०), मेणी (सांकृबी नाला, बेलदारवाडी, तडवळे वाडदरा (४५), येळापूर (चव्हाणवाडी), करमाळे नंबर २ (४०), आटुगडेवाडी (मेणी), धामवडे (कुंडनाला), लादेवाडी (३५), कोंडाईवाडी नंबर १ व २, शिरशी (कासारकी), प. त. शिराळा, नंबर २,पावलेवाडी नंबर १ व २ (२५), पाचुंब्री (२०), चरणवाडी नंबर १, भाटशिरगाव (१५). कोरडे पडलेले पाझर तलाव – सावंतवाडी, शिरशी नंबर १, शिरशी भैरवदरा आणि काळेखिंड, शिवरवाडी, भैरेवाडी, निगडी जुना कासारदरा, निगडी खोखडदरा, करमाळा नंबर १, इंगरूळ हे दहा तलाव कोरडे पडले आहेत..
Discussion about this post