
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाच्या गृह (शहरे), महसूल, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीमधील सहाव्या माळ्यावरील क्रमांक ६२८ या नवीन दालनात प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दालन प्रवेशानंतर त्यांनी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.राज्यमंत्री योगेश कदम यांचे मुळ जन्मगाव मौजे गिरवी ता फलटण जि.सातारा असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील गिरवी गावात मंत्री योगेश कदम यांनी नवीन दालनात प्रवेश केला त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे..
Discussion about this post