आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार खर्चात कपातीची अधिकारी आणि कर्मचारी यांची सध्या अस्तित्वात असलेली मोबाईल सिम कार्ड बंद करण्यात आल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. यामुळे नागरिकांची मात्र प्रचंड गैरसोय झाली आहे. मात्र प्रत्येकाने खाजगी सिम चा वापर करावा आणि तो तो नंबर कायमस्वरूपी सुरु ठेवावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. सध्याची सिम कार्ड नंबर हे महापालिकेच्या डायरीवर संकेतस्थळावर तसेच अन्य फलकांवर दर्शवण्यात आले आहेत मात्र आता हे सिमकार्डच बंद झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जवळ जवळ १४० सिम कार्ड सध्या महापालिकेमध्ये जमा आहेत. या सिम कार्डच्या वापरापोटी महापालिकेला दरमहा तब्ब्ल साडे तीन लाख रुपयाच्या बिलाचा भरणा करावा लागत होता. तर मोबाईल कंपन्यांनी आपल्या कोल्च्या आणि इंटरनेटच्या दारात काही वर्षांपासून वाढ केल्याने हा बिलाचा भरणा दिवसेंदिवस वाढत होता. आता प्रमुख मुद्दा असा आहे कि ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सिम जमा करून खाजगी नंबर वापरण्यास सुरुवात केली आहे त्यांनी त्यांचे हे नंबर जाहीर करणे महत्वाचे आहे. या सिम कार्ड जमा करण्याच्या भूमिकेवरून काही अधिकारी आणि कर्मचारी नाराज असल्याचे चित्र आहे. तर आपले खाजगी नंबर नागरिकांना देण्यावरूनही काहीं मंडळी नाराज आहेत.
Discussion about this post