सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आज अखेर नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस रोज पडत असतो मात्र आयुक्त शुभम गुप्ता यांनी यासाठी सक्षम यंत्रणा उभी केली असून गेल्या काही महिन्यांपासून या तक्रारींची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. नागरिक तक्रार निवारण कक्षाची आयुक्तांनी स्थापन केल्याने विविध विभागांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने होत आहे. सध्या १०० दिवस गतिमान प्रशासनाचे या उपक्रमाच्या माध्यमातून या कक्षामधील ५२५ पैकी २२५ तक्रारींचे यशस्वी निवारण झाले आहे. याबाबत आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ते म्हणाले, GRC ही सुविधा सध्या अत्यंत यशस्वी होताना दिसून येतेय ती अशीच कार्यरत राहील यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा आणि संवाद साधणारी प्रणाली म्हणून कार्यरत राहील. लवकरच आम्ही संवाद जनतेशी हा उपक्रम हाती घेत आहोत. यामध्ये नागरिकाच्या तक्रारी एका ठिकाणी एका वेळी ऐकून घेऊन निर्णय घेता येईल असे नियोजन सुरु आहे. एप्रिल २०२४ पासून मार्च २०२५ पर्यंत एकूण ५११ तक्रारी आमच्या प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या त्यापैकी आम्ही २९२ तक्रारीचा निपटारा केला आहे. ऑनलाईन पद्धतीनेही नागरिक आपल्या तक्रारी आमच्यापर्यँत पोचवू शकतात तशी सोय करण्यात आली आहे. या दाखल होणाऱ्या तक्रारी मध्ये अतिक्रमण, नगररचना विभाग ड्रेनेज रस्ते लाईट या विभागाच्या तक्रारी अधिक आहेत.
Discussion about this post