माजलगाव:- माजलगाव ते मंजरथ रस्ता हा खूप वर्दळीचा आणि इथे अनेक भागातून लोक दशक्रिया विधी साठी येतात.मंजरथ हे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
त्यात या रस्त्यावर मनुरवाडी, देपेगाव फाटा ही बरीच गावे येतात त्यात, या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की त्यात माणसांना पायी देखील चालता येत नाहीये.जनावरांचे खूप हाल होत आहेत ,या उघड्या पाडलेल्या खडीने जनावरांच्या पायांना दुखापत झाल्या.
अनेक दुचाकी गाड्यावरचे लोक खडीवरून घसरुन पडल्या आहेत,आणि महत्वाचं म्हणजे रस्त्याचे एवढे हाल झाले आहेत की एका महिलेची प्रसूती पण ऑटो मध्ये झाली,
काम चालू होऊन दीड वर्ष होत आले आहे ,त्यामुळे काम लवकरात लवकर करण्यात यावे ही ग्रामस्थांची मागणी होत आहे..
Discussion about this post