
उमरी तालुक्यातील रामखडक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतल्याने 3 जनावरे दगावली आहे. तसेच इतर जनावरे आजारामुळे त्रस्त आहेत.जनावरे मृत झाल्यामुळे गावात चर्चा सुरु झाली असून भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
रामखडक येथील पशुपालक माधवराव लक्ष्मण शिंदे यांच्या जनावराला तीन दिवस औषध उपचार केल्यानंतरही वाचवता आलं नाही.तर आणखी एक पशुपालक सखाराम पुंडलिक शिंदे यांचीही जनावरं तीन दिवसात आजारी पडून गेली. आलेल्या डॉक्टरांनी वेगवेगळी निदान करून सुद्धा जनावर दगावली. हा कुत्रा आला, आणि पशुपालक यांच्या समोर तो कुत्रा जनावरांना चावा घेतला आणि माणसाच्या अंगावर धावून येत होता,
पशुधन विकास अधिकारी आणि त्यांचे पथक गावात येऊन लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा अजून जनावर दगावण्याची शक्यता,
गावात चिंतेचं वातावरण :
लम्पी आजारात पशुधन मृत्युमुखी पडल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळते. मात्र रेबीजसारख्या आजाराने पशुधन मृत्युमुखी पडल्यास शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. एकाच गावात पंधरा दिवसाच्या आत 3 जनावर रेबीजमुळे मृत्यूमुखी पडल्याने गावात चिंतेचं वातावरण आहे..
Discussion about this post