प्रदिप नागेनट्टी यांना मराठी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
आजरा- चंदगड: प्रतिनिधी,
मराठी भाषा गौरव दिनाच्य निमित्ताने सन २०२४- २५ चा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचा मराठी प्रेरणा पुरस्कार नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित नरसिंह हायस्कूल निट्टूर चे मराठी विषयाचे तज्ज्ञ अध्यापक,अध्यापक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक,
श्री प्रदिप नागेनट्टी सर यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी एन. आर. भाटे होते . प्रास्ताविक रविंद्र पाटील यांनी केले. यावेळी राघवेंद्र इनामदार,महादेव शिवणगेकर, सुभाष बेळगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. ” पुरस्कार प्रेरणा देतात. आणि प्रेरणेने व्यक्तीमत्व घडतात. “असे प्रतिपादन
सत्कारमुर्ती प्रदिप नागेनट्टी यांनी केले.
कार्यक्रमाला अध्यापक संघाचे बी एन पाटील,राजेंद्र शिवनगेकर,संजय साबळे
मोहन पाटील, एस.पी. पाटील, कमलेश कर्निक,अनंत पाटील, व्ही.एल. सुतार, एच.आर. पाऊसकर सौ. पूजा नागेनट्टी व मराठी अध्यापक परिवारातील सर्व पदाधिकारी,सदस्य
उपस्थित होते. कार्यकमाचे सूत्रसंचालन आर. जे. मस्कर यांनी तर आभार सौ.एस. एम. विभूते यांनी मानले .
Discussion about this post