
शरद आत्मनिर्भरकडून पलूस व कडेगाव तालुक्यातील ५०० बांधकाम मजुरांना एकाचवेळी सुरक्षा संच व संसार संचाचे वाटप करण्यात आले.
क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमक्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकीच एक म्हणजे शनिवारी, १ मार्च रोजी पलूस व कडेगाव तालुक्यातील ५०० बांधकाम मजुरांना एकाचवेळी सुरक्षा संच व संसार संचाचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे; अशांचे वारसदार म्हणून पत्नीला २ लाख रुपये आर्थिक मदत व पुढील ५ वर्षांसाठी प्रती महिना दोन हजार रुपये पेन्शन सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. कामगारांची नाव नोंदणी झाल्यानंतर सुरवातीला सुरक्षा संच तसेच संसार संच देण्यात येतो. त्यानंतर बांधकाम कामगारांची मुले शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतील तर अशा मुलांसाठी शिष्यवृत्ती व त्यांच्या विवाहप्रसंगी आर्थिक सहाय्य सुद्धा देण्यात येते. असे असले तरी या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ खर्ची होतो. त्याचप्रमाणेअशिक्षित असणाऱ्या बांधकाम कामगारांना याबद्दल योग्य ती माहिती नसल्याने अलीकडच्या काळात दलालांची संख्या अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. याच सर्व गोष्टींचा अभ्यास करून आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धनश्री शरद लाड यांच्या अध्यक्षतेखाली शरद फौंडेशन संचलित शरद आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे अर्ज दाखल करण्यापासून ते सर्व लाभ पोहोचवण्यापर्यंत जबाबदारी घेतली जाते. यावेळी शरद लाड यांनी उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला.ते म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व संसार संच वाटप करण्यात आले. या कामगार मंडळींच्या कुटुंबीयांचे लाभलेले आशीर्वाद व शुभेच्छा मला पुढील वाटचालीसाठी बळ देणारे आहेत. हा उपक्रम राबवण्यासाठी बहुमोल योगदान देणारे शरद आत्मनिर्भर अभियान, क्रांती महिला प्रतिष्ठान, क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट, शरद लाड युवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार. सदर कार्यक्रमासाठी पलूस व कडेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, शरद फौंडेशनचे संचालक, विभागीय संघटक, अधिकारी-कर्मचारी वर्ग यांच्यासह बांधकाम कामगार लाभार्थी उपस्थित होते.
Discussion about this post