
प्रतिनिधी/शिराळा
ज्या गावांच्या शाळा सुंदर व चांगल्या पद्धतीने योग्य अध्यापनाने साकारलेल्या आहेत. त्या गावांची प्रगती व विकासाची गती वाढलेली दिसून येते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले. नाटोली (ता. शिराळा) येथील प्राथमिक शाळेत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना वही व खाऊवाटप प्रसंगी बोलत होते.
नाईक म्हणाले, “गावामध्ये मंदिराची सुधारणा करून जीर्णोद्धार करण्यासाठी लोकवर्गणीमधून मोठा खर्च करत असतो त्याच पद्धतीने आपल्या अनेक पिढ्या शिक्षणामुळे पुढे येण्यासाठी आपल्या शाळेसाठी काही करू शकलो तर गावासाठी चांगले काम झालेले दिसून येईल. गावचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला पहावयास मिळेल.”
माजी राज्यमंत्री नाईक यांच्या काळामध्ये वाहने, दळणवळणाची साधने व मोबाईल सुविधा कुठल्याही प्रकारे नसताना त्या काळापासून विकासाचा पाया रचण्याचे काम त्यांनी केले. अनेक संघर्षांना तोंड देत ते आज अखेर अखंडपणे कार्यरत आहेत. यावेळी लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील, प्रचिती दुद्ध संघाचे संचालक अनिल पाटील, बबन पाटील, शंकर नाकील, मधु साळुंखे, विकास पाटील, दत्ता नाकील, शिवाजी सातपुते, एकनाथ वरेकर, मुख्याध्यापक जयसिंग पाटील, राजेंद्र पाटील, दत्ता खोत, तानाजी निंबाळकर, संतोष पाटील, डॉ. सयाजी शिंदे, अमोल पाटील उपस्थित होते..
Discussion about this post