“पुषा” फेम दारू तस्करीला गोंडपिपरी पोलिसांनी दिला अंजाम,एक अटकेत
धडाकेबाज कार्यवाहीत एकूण १३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोंडपिपरी : ” पुषा “फेम दारू तस्करीला गोंडपिपरी पोलिसांनी अंजाम दिला आहे.एका पिकअप वाहनातून विशेष पॅकिंगद्वारे करण्यात येणारी दारू तस्करी रोखण्यास स्थानिक पोलिसांना मोठे यश आले. या कारवाईत १३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास अटक कण्यात आली आहे.
चंद्रपूर – आलापल्ली मार्गावर दारूची तस्करी होणार आहे, अशी विश्वसनीय माहिती पोलिसांना मुखबिराकडून मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरगाव टोल नाक्याजवळ सापळा रचून तळ ठोकला.त्या दरम्यान येणारी पिक अप क्रमांक एम एच -३४ – बी झेड ५४५८ या वाहनाला रोखून झळती घेतली असता त्यात विशेष पॅकिंगमध्ये देसी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला.हि कार्यवाही दि.३ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. या कार्यवाहीत एकूण १३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालक दानिश इलियास शेख (२४ वर्ष) रा. बालाजी वार्ड ,चंद्रपूर या आरोपीस ताब्यात घेऊन प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अंतर्गत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे येथील जिल्ह्यातील दारू तिकडे पार्सल केली जाते. असे कितीतरी दारूशी संबंधित प्रकरणे समोर आले आहेत. एकीकडे उत्पादन शुल्क विभाग विभाग आणि पोलीस विभाग अवैध दारू व्यवसायावर करडी नजर ठेऊन, कारवाई करण्यात व्यस्त असताना दारू माफिया मात्र दारू तस्करीच्या नवनवीन क्लृप्त्या वापरत असताना दिसून येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे,सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश कराडे, श्रेणी स.पो.नि. मारोती मरापे, पोलीस अमलदार अतुल तोडासे, तिरुपती गोडसेलवार,प्रशांत नैताम, सचिन झाडे, सचिन मोहरले, सुनिल गव्हरे, रियाज शेख यांनी केली.
Discussion about this post