
शिराळा -:
चिकुर्डे (ता. वाळवा) येथे माजी मंत्री व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित सुधा उद्योग समूहाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. चिकुर्डेतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांमध्ये हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
येथील सुधा उद्योग समूह हा शेती व शेतीपूरक उद्योग समूहाची संबंधित साहित्य निर्माण करणारा उद्योग समूह आहे. शिराळ्याचे यशवंत उद्योग समूहाचे संस्थापक शिवाजीराव नाईक व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांच्या सोबतचे राजकीय व सामाजिक संबंध सुधा उद्योग समूहाचे निकटचे राहिले आहेत. त्याच माध्यमातून आदर्श नेता म्हणून शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सुधा उद्योग सुमुहाने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करून चांगला स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
चिकुर्डे जिल्हा परिषद शाळा, भारत माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आनंद गुरुकुल स्कूल चिकुर्डे शिवजयत अकॅडमी यासह विविध संस्थांच्या शालेय संस्थांच्यामधून हा मोफत वाया वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. विद्यार्थ्यांना मोफत व यांचे वाटप करून
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित एक सामाजिक संदेश सुधा उद्योग समूहाने दिला आहे.
यावेळी सुद्धा उद्योग समूहाचे चेअरमन शिवाजीराव पाटील म्हणाले, शिराळा वाळवा व सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आदर्श नेता म्हणून शिवाजीराव नाईक यांचा नामोउल्लेख सर्व स्तरातून केला जातो. सर्वसामान्यांच्या विकासाची कामे, व्यक्तिगत कामे तसेच शिराळा, वाळवातील सजीव विकास कामांचे निर्मात म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आपलेपणाने जपणारे व आपलेसे वाटणारे नेतृत्व शिवाजीराव नाईक यांचे आहे. अशा सामाजिक नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साजरा केला जावा, अशी अपेक्षा उद्योग समूहाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. आणि त्वरित त्या अपेक्षेचे कृतीत रूपांतर झाले. याचे समाधान फार मोठे आहे.
यावेळी सुधा उद्योग समूहचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रभावती पाटील, माजी मुख्याध्यापक बाबासाहेब खैरमोडे, आनंदराव पाटील, जगन्नाथ विभुते पांडुरंग पाटील, अर्जुन गर्जे, विलास बुरशे, राजेंद्र पाटील, विजया पाटील, सारिका पाटील, श्रीकांत बुरशे, अॅड. संतोष पाटील, उत्तम पाटील, पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post