प्रति,
मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई
मार्फत,
मा. तहसीलदार साहेब,
तहसील कार्यालय, उमरगा
ता. उमरगा जि. धाराशिव
विषय :- अनुसुचित जाती वर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास विरोध करणारे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांचा जाहिर निषेध व प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करून निषेध नोंदवत असले बाबत.
महोदय,
उपरोक्त विषयांस अनुसरून निवेदन करण्यात येते की, दिनांक 01/08/2024 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयने अनुसुचित जातीच्या वर्गीकरणास मान्यता दिले असल्यामुळे त्या संवर्गातील छोट्या छोट्या जाती या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याच्या उद्देशाने या संवर्गातील मातंग समाजाच्या सर्व संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. या निर्णयामुळे भविष्यात सामाजिक दृष्ट्या उपेक्षित असलेल्या सर्व घटकांना न्याय मिळेल व परिवर्तणाच्या मुख्य प्रवाहात हा समाज घटक सामिल होण्यास नक्कीच मदत होईल. परंतु या राज्याचे विरोधीपक्ष नेते मा. विजय वड्डेटीवार हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधी भुमिका घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयाचाच नाही तर संविधानाचा देखिल अपमान करत आहेत. म्हणुन त्याच्या विधानांचा व कृत्याचा दिनांक 23/08/2024 रोजी दुपारी 12 वाजता तहसिल कार्यालय, उमरगा समोर विजय वड्डेटीवार यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन करून जाहिर निषेध नोंदवत आहोत.
विजय भाऊ तोरडकर
उमरगा तालुकाध्यक्ष
Discussion about this post