नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगांव शहर येथे भारतीय जनता पक्षा तर्फे घर घर तिरंगा अभियान सुरु करण्यात आले. या वेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भा .ज .पा. च्या जेष्ठ नेत्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड.जयश्री ताई दौंड या होत्या. सदर कार्यक्रमा प्रसंगी ॲड.दौंड यांनी ध्वजारोहणाचे महत्त्व आणि त्या बद्दल चे नियम सर्व उपस्थितीत कार्यकर्त्यांना समजावून सांगितले आणि आपण प्रत्येकाने आपल्या घरावर आणि आपल्या प्रभागातील घरांवर तिरंगा ध्वज फडकावून त्याला वंदन करणे असे आवाहन केले.
तसेच येत्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या त्यासाठी आपण सर्वांनी तयार रहावे अशा सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या. या वेळी संजय सानप, राजेश बनकर, सोमनाथ घोंगाणे, तारा शर्मा, अशोक पेंढारकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
सदर बैठकीत जिल्हा सरचिटणीस संजय सानप, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात, शहर अध्यक्ष राजेश बनकर, शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा, दीपक पाटील, शहर सरचिटणीस सोमनाथ घोंगाणे, सतिश शिंदे, राजेंद्र गांगुर्डे, अनु.जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाबाजी शिरसाठ, महिला शहर अध्यक्षा अन्नपुर्णा जोशी, तारा शर्मा, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष दिनेश दिंडे, नांदगांव तालुका विधानसभा विस्तारक अतुल झालटे, बबन मोरे, अनिल धामणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अशोक पेंढारकर, दिपक थोरात, रविंद्र सानप, अनु.जाती मोर्चा शहर अध्यक्ष धनराज मंडलीक, ॲड. हिरालाल गांधी, ॲड.उमेश सरोदे, शहर कोषाध्यक्ष धम्मवेदी बनकर, आदिल कादरी, कैलास लोखंडे, किरण पैठणकर, परशराम गरुड, संतोष पारवे, अमोल चव्हाण, अभिषेक विघे, डॉ. बाळासाहेब आहेर, निलेश पगारे, बापु भालेकर, मनोहर निकम, शरद उगले, चेतन मोरे, सुरज फुलारे, महिला मोर्चा च्या निकिता आहिरे, सुनिता जाधव, विद्या कुलकर्णी, वंदना साळुंखे, मंगल बांडके तसेच भाजपा चे शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, आदी उपस्थीत होते.
या वेळी ॲड. दौंड, संजय सानप, प्रदीप थोरात, राजेश बनकर यांच्या हस्ते गोरख गुढेकर, दर्शन शेलार यांची युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, सपनेश विघे यांची युवा मोर्चा शहर सचिव व चंदु घुगे यांची युवा मोर्चा संघटक पदी निवड करण्यात आली.
कार्यक्रमात सगळ्यांना तिरंगा ध्वजा चे वाटप करण्यात आले. ॲड.उमेश सरोदे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमा ची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Discussion about this post