( मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे समीर बल्की विभाग प्रमुख आंबोली )
:- तालुका प्रतिनिधी
राज्यात शाळकरी आणि अल्पवयीन मुलीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले असुन अन्याय अत्याचारामुळे राज्यांतील लाडक्या बहिणीच्या लेकी असुरक्षीत झाल्या आहेत . राज्यांतील लेकीच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आणि लेकी सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी समीर बल्की यांनी केली आहे..
एका रात्रीत नोटा बंदी केली जाते, एका रात्रीत लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला जातो, एका रात्रीतून नवीन सरकार तयार केले जाते, मग राज्यांतील देशातील लेकींवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या नराधमाना मोकळे का सोडले जात आहे ? अशा नराधमाना एका रात्रीतून फासावर लटकवले पाहिजे. अशीही मागणी यांनी केली आहे.
राज्यांतील महिलांवर दररोज मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहेत हे अत्याचार त्वरित थांबले पाहिजेत सरकारने यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि राज्यांतील महिलांवर तसेच मुलींवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी गुन्हेगारांना एका रात्रीत फासावर लटकवले पाहिजेत अशीही मागणी समीर बल्की विभाग प्रमुख आंबोली. यांनी केले आहे.
Discussion about this post