राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देशातील सर्व वाहनांना एच एस आर पी अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसवण्याची मोहीम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे जिल्ह्यातील जवळजवळ पाच लाखांच्या वर वाहनांना प्लेट बसवण्याचे उद्दिष्ट असून ऑनलाईन पद्धतीने सध्या दहा हजार वाहनधारकांनी आपली नोंदणी या नंबर प्लेट साठी केल्याचे सांगली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. ते म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीने हि नंबर प्लेट अत्यंत महत्वाची असून ३० एप्रिल पर्यंत वाहनधारकांना हि नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ज्यांची वाहने पंधरा वर्षांपूर्वीची आहेत आणि पुनर्नोन्द केलेली नाहीये त्यांनाही हि नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. यावेळी सहा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे उपस्थित होते. या नंबर प्लेट नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे कोणताही वाहन धारक हि नांदणी घरबसल्या करू शकतो. जिल्ह्यातील सात ठिकाणी वाहन धारकांच्या सोयीसाठी स्वतंत्र केंद्राची सोय केली आहे यामध्ये मिरज अंकली सांगली विटा इस्लामपूर या ठिकाणी हि केंद्रे आहेत.
Discussion about this post