
प्रतिनिधी , विजय बारस्कर , नेर..
यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनी 2025
सविस्तर माहिती अशी की, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा( आत्मा) यवतमाळ कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ते दहा मार्च 2025 पर्यंत समता मैदान पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे दिनांक 6 मार्च 2025 ला आदरणीय श्री संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ यांच्या हस्ते उद्घाटन दुपारी एक वाजता होणार आहे व अध्यक्षीय स्थान भूषविणार आहे. प्रमुख उपस्थिती आदरणीय प्राध्यापक डॉ.अशोकराव उईके, आदिवासी विकास मंत्री व आदरणीय इंद्रनील नाईक राज्यमंत्री राहणार आहे. त्याचप्रमाणे विशेष निमंत्रित, विशेष उपस्थिती, विशेष विनीत आदरणीय मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ वनशेती संशोधन विभाग चेतना ऑर्गानिक प्रगतिशील शेतकरी संरक्षित शेती लागवड तंत्रज्ञान प्रक्रिया शेतमाल निर्यात केंद्रीय कापूस संशोधन कृषी प्रक्रिया रेशीम शेती शेतकरी उत्पादन कंपनी शासकीय योजना अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान इत्यादीची सर्व माहिती व विकसित तंत्रज्ञान आयोजित केलेले आहे तरी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक आदरणीय शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आपल्या प्रगतीशील मार्ग सरळ व सोपा करून घ्यावा याकरिता हे जिल्हा कृषी महोत्सव प्रदर्शनी आयोजित केलेली आहे..
Discussion about this post