प्रेस नोट:
•गडचिरोली जिल्ह्यात जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, येनापूर द्वारा राबविल्या जाणाऱ्या रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत रक्तदान जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुका स्तरावर रक्तदान प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
•ही मोहीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रक्तदान जागरूकता निर्माण करत आहे. अधिकाधिक नागरिकांना रक्तदान चळवळीशी जोडण्यासाठी आणि रक्तदानाविषयी असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी तालुका रक्तदान प्रमुख महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांच्यावर स्थानिक स्तरावर रक्तदान शिबिरे आयोजित करणे, रक्तदाता नेटवर्क उभारणे आणि रक्तदान चळवळीला अधिक बळकटी देण्याची जबाबदारी असेल.
•या अभियानाअंतर्गत खालील तालुक्यांसाठी रक्तदान प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे:

(१) तालुका कुरखेडा:- श्री. प्रविन दयाराम कोवाची मोबाईल क्रमांक:-9637165828

(२) तालुका गडचिरोली:- श्री.जयंत शंकर जथाडे मोबाईल क्रमांक:- 94217 31325

(३) तालुका मूलचेरा:- श्री.मंगल मनमद मंडल मोबाईल क्रमांक:- 93566 39008
•ही नियुक्ती दिनांक 20/02/2025 पासून लागू करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीताताई बंडावार यांनी नियुक्त तालुका रक्तदान प्रमुखांना शुभेच्छा दिल्या आहेत व त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
•या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील रक्तदान चळवळीला मोठी चालना मिळेल आणि अधिकाधिक नागरिक रक्तदानासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा आहे.
Discussion about this post