न्हावेली / वार्ताहर मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मळगाव गाव मर्यादित महिलांसाठी पाककृती स्पर्धा आयोजन रविवार ९ मार्च रोजी सांयकाळी ४ वाजता करण्यात आले आहे.कै. प्रा.रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित व स्व.यशवंती धोंडू पटेकर स्मृती प्रित्यर्थ श्रीमती उज्वला यशवंतराव खानविलकर पटेकर प्रायोजित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे- स्पर्धा मर्यादित राहिल,स्पर्धा महिलांसाठी खुली आहे.पाककृती नाचणीपासून बनविलेला कोणताही एक पदार्थ,पाककृती स्पर्धेसाठी पदार्थाची पौष्टिकता,पदार्थाची चव दर्जा व नाविन्यपूर्णता,पदार्थाची दैनंदिन आहारातील उपयुक्तता,पदार्थाची सजावट व मांडणी,पाककृती बनविण्याची कृती सुलभता व इंधन बचत याप्रमाणे प्रत्येकी १० गुणाप्रमाणे एकूण ५० गुणांचे गुणाकंन होईल.परीक्षकांचा निर्णय अंतिम होईल.प्रत्येक स्पर्धकांने बनविलेल्या पाककृतीचे लेखी स्वरूपात पाककृती ए फोर पेपरवर लिहून सादर करणे आवश्यक आहे.स्पर्धेसाठी प्रवेश फि रुपये ५० एवढी असून प्रथम नावनोंदणी करणाऱ्या पहिल्या फक्त २० स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे.स्पर्धेच्या वेळेपूर्वी किमान १ तास अगोदर स्पर्धेच्या जागी पाककृतीची मांडणी करणे आवश्यक आहे.स्पर्धेसाठी आयोजकांकडून पाककृती मांडणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.स्पर्धेतील उत्कृष्ट पाककृतीना प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ १ व २ याप्रमाणे आकर्षक पारितोषिके देण्यात येतील.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्पकांनी शुक्रवार ७ मार्चपर्यंत सायंकाळी ७ वाजेपर्यत ग्रंथालयाकडे नोंदणी आपल्या मोबाईल नंबरसह करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाछी ९४२११४९३४४ व ८१६९५८४२६१ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे .
Discussion about this post