मुक्ताईनगर/ प्रतिनिधी ज्ञानेश्वर सावळे
संतोष देखमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी याच्या विरोधात युवासेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येऊन वाल्मीक कराडचा पुतळा जाळण्यात आला. महाराष्ट्रातील कायदा सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी व अश्या विकृतींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे व प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सह त्यांच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी युवासेना शिंदे गट मुक्ताईनगरच्या वतीने प्रवर्तन चौक येथे निषेध आंदोलन करण्यात येऊन वाल्मीक कराड याचा पुतळा जाळण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, युवा सेना तालुकाप्रमुख जितेंद्र उर्फ गोलू मुऱ्हे, युवासेना उपतालुका प्रमुख मितेश पाटील, शिवसेना सोशल मिडिया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील , व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन कुमार जैन, चांगदेव सरपंच निखिल बोदडे, सुभाष माळी, अक्षय चौधरी, दीपक कोळी, निमखेडी सरपंच तायडे, संचालाल वाघ, विजय पाटील, मंगल घोगरे, प्रकाश गोसावी, अतुल पाटील, नरेंद्र गावंडे, विशाल नारखेडे, दीपक खेवलकर, अजय तळेले, वैभव पाटील, संतोष माळी, आकाश सापधरे, कृष्णा पाटील, संतोष माळी, अर्जुन भोई, स्वप्निल श्रीखंडे, डीगंबर चव्हाण आदींसह युवा सेना शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
Discussion about this post