हदगाव प्रतिनिधी: आज दि.५ मार्च बुधवार हादगाव आगारांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रणित शेवा शक्ती एसटी कर्मचारी संघटनेची पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी निवड झाली त्यामध्ये आगार आध्यक्ष म्हणून श्री एम डी बोरकर (चालक) तर सचिव श्री आर टी वानोळ (वाहक) महिला अध्यक्ष सौ आर व्ही बारसे (मुंजाळ) मॅडम यांच्या नियुक्ती करण्यात आल्या या कार्यक्रमाला आगारातील अनेक कर्मचारी उपस्थित होते तसेच सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघाचे महाराष्ट्र सचिव सतीश जी मेटकरी साहेब आणि महिला सचिव राजे मॅडम उपस्थित होत्या बैठकीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न अडचणी मेटकरी साहेबांना सांगितले सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन लवकरच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सेवाशक्ती कर्मचारी संघ आक्रमकपणे प्रश्न अडचणी सरकार दरबारी मांडण्याचे मेटकरी यांनी सारथी महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
Discussion about this post