नेर, प्रतिनिधी विजय बारस्कर ✍
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ७ मार्च २०२५ रोजी दोन महिन्यांचा सन्माननिधी (₹३,०००) जमा केला जाणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केली.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता मिळणार
राज्य सरकारच्या निर्णयानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्र करून एकूण ₹३,००० रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
महिला दिनाची विशेष भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार असून, हा निधी महिला दिनाची विशेष भेट मानली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा निधी ७ मार्चपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.
Discussion about this post