प्रमुख निर्णय:
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेत जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹५०० चे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ-अटेस्टेड) अर्ज लिहून संबंधित प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष फायद्याचा निर्णय
दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांना विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी मोठा खर्च करावा लागत असे. या निर्णयामुळे ३ ते ४ हजारांचा खर्च वाचणार असून, प्रक्रिया सुलभ होणार आहे.
तात्काळ अंमलबजावणीचे आदेश
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी आता अनावश्यक खर्च आणि कागदपत्रांच्या गोंधळातून मुक्ती मिळणार आहे.
Discussion about this post