वाई प्रतिनिधी – (शर्मिला बाबर) पाचगणी शहरात पोलिसांच्या चोरून कष्टकऱ्यांना जुगार चक्री मटका माफियांचा विळखा साताऱ्यातील चक्री माफीयांचे धागेद्रोरे अखेर पाचगणी शहरापर्यंत माफियांवरती पोलीस कारवाई कधी करणार..?
सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या पाचगणी शहरांमध्ये आता जुगार चक्री मटका माफीया यांनी घुसखोरी केली असल्याचे दिसून आले आहे, पाचगणी पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकून छत्रपती शिवाजी महाराज चौक देशी दारू अंड्याच्या पाठीमागे वडापाव गल्ली मध्ये आदर्श गल्लीमध्ये तुफान बेभान मटका जुगार व घर उध्वस्त करणारा चक्री जुगार हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून आता या धंद्याचे ग्राहक कष्टकरी मजूर कामगारांसह शाळकरी मुले देखील ग्राहक बनू लागले असल्याचे दृश्य निदर्शनास आले आहे, या शैक्षणिक आणि पर्यटन पाचगणी शहराला जुगार मटका व चक्री मटका वाल्यांकडून पाचगणी पोलीस प्रशासन वाचवणार का? असा असणारा प्रश्न स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांना पडला असून पाचगणी पोलीस प्रशासन या चक्री मटका जुगार वाल्यांच्या मुस्क्या आवळणार का? सातारच्या चक्री मटका वाल्याला पाचगणीच्या मटका वाल्याला पाचगणी पोलीस प्रशासन लगाम घालणार का ? की पुन्हा अभय मिळणार ? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.!

Discussion about this post