प्रा दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी)
साखरखेर्डा येथे नकली सोने गहाण ठेवून येथील एका पतसंस्थेची एकुण ₹. ५९,२७,५००/- रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील ५ आरोपींवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ०३ सह भारतील न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटना दिनांक १६/०७/२०२४ चे १०.०० वा ते १३/०२/२०२५ चे १८.०० वाजे दरम्यानची असून आरोपींविरुद्ध काल ता.११/०३/२०२५ चे २०.५४ वा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गुन्हे दाखल होताच या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत फिर्यादी अनिल केशवराव गाडे ,वय ४८ वर्ष ,व्यवसाय -नोकरी जनरल मॅनेजर बालाजी अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी लिमीटेड ,चिखली, रा. राऊतवाडी फुलझाडे यांचे चक्कीजवळ चिखली, जिल्हा बुलडाणा यांनी येथील पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी➡️ १) अजिंक्य दिलीप शहाणे ,वय ३८ वर्ष, मु. पो साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा
२) राजु प्रभाकर केंधळे ,वय ४५ वर्ष, मु. पो सवडद, ता. सिंदखेड राजा, जिल्हा बुलडाणा
३) भगवान सुभाष शहाणे ,वय ३९ वर्ष, मु. पो साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा ,जिल्हा बुलडाणा
४) प्रदिप नामदेव आवचार ,वय ४५ वर्ष, मु. पो साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा ,जिल्हा बुलडाणा
५) गोपाल रंगनाथ पाझडे ,वय ३८ वर्ष, मु. पो. साखरखेर्डा, ता.सिंदखेडराजा ,जिल्हा बुलडाणा या ५ आरोपींवर अप नं व कलम➡️ ६९/२०२५ बि.एन.एस कलम ३१८(४), ३३८,३३६ (३) तसेच ठेवीदारांच्या वित्तीय स़स्थामधील हितसंबंधांचे रक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, येथील
बालाजी अर्बन को – ऑफ . क्रेडिट सोसायटी,शाखा साखरखेर्डा शाखेत नकली सोने तारण ठेवून कोट्यावधीचा कर्ज घोटाळा झाला असल्याची बाब समोर आली होती .याबाबत बालाजी अर्बन च्या अधिकाऱ्यांनी येथील साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये ता.१४ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी पोलिसांनी तक्रार चौकशीवर ठेवली होती.
पोलिसांनी बॅंक प्रशासनास अशा प्रकारची फसवणूकीची आणखी काही गैरप्रकार आहेत कां यांचा शोध घेण्यास सांगितले होते.तसेच सदर तक्रारीबाबत वरिष्ठांना कळवून सध्या तक्रार चौकशीवर ठेवून वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार येईल असे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले होते. याबाबत सविस्तर असे की,
साखरखेर्डा येथे बालाजी अर्बन को– ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली यांची एक शाखा आहे . ही पतसंस्था अल्प व्याज दराने किरकोळ व्यापारी, लहान व्यापारी यांना कर्ज देते . तसेच सोने तारणावर सुध्दा कर्ज देते.
. बॅंकेच्या प्रशासनाने २०१९ साली किंवा त्या अगोदर साखरखेर्डा येथील एका सोनारा सोबत करारनामा करून त्यांना सोने मुल्यांकन म्हणून नियुक्त केले होते. या सोनाराने सोने शुध्दतेचे मुल्यांकन करून किमान २५ ते व्यापाऱ्यांनी सोने तारण कर्ज उचलले असल्याचे कळते. काही कर्जदार व्यापाऱ्यांना याबाबत कुणकूण लागताच आणि सोसायटीने वसूली नोटीस बजावताच आपली व्यापारी प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून सोने तारण कर्ज भरणा केला . कर्जाचा भरणा केल्यानंतर बॅंक मॅनेजर यांनी बॅंकेमधे ठेवलेले गहाण सोने ग्राहकांना परत केले तेव्हा सदर सोने हे नकली असल्याचे निदर्शनास आले
. ज्यांची स्वतः ची कोणतीही ऐपत नाही,स्वत:चे घर नाही , बायको नाही अशा लोकांच्या नावे ५० लाख ते एक कोटी रुपयांच्या घरात सोने तारण कर्ज घेतल्याचे सोसायटीच्या लक्षात यायला पाहिजे होते . नेमकं सोनं खरे की खोटे याची योग्य पडताळणी करायला पाहिजे होती.या गैरप्रकारात कर्जदार,सोनार आणि आणखी कोण कोण सामील आहेत ही बाब चौकशी अंती समोर येणार आहे. बालाजी अर्बन सोसायटीच्या बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ता.१४ फेब्रुवारी ला
त्या सर्व कर्जदार ,व्यापारी आणि व्यक्ती व सोनार यांच्या नावाने साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती .ठाणेदार गजानन करेवाड यांनी बॅंक प्रशासनास ,अशा प्रकारे कर्ज दिलेल्या सर्वच कर्जपुरवठा प्रकरणाची तपासणी करून आणखी काही गैरप्रकार आढळतो कां याची पडताळणी करावी असे सांगितले होते.
या कर्जदारांनी कर्ज थकविल्याने बॅंकेचे अधिकारी कर्जदारांकडे वसूली साठी जावू लागले तेव्हा कर्जदार कर्ज भरण्यासाठी टाळाटाळ करू लागले.
जेव्हा थकीत कर्जदारांकडे वसूली साठी अधिकारी गेले तेव्हा सोसायटीची फसवून झाली असल्याचे बॅंकेच्या लक्षात येताच त्यांनी येथील पोलिस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली होती.त्यामुळे ज्यांनी ज्यांनी नकली सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे त्यांचे धाबे दणाणले होते. आता हे नकली सोने गहाण प्रकरण आणखी कोणते वळण घेते आणि यात आणखी कोण कोण आहेत याकडे साखरखेर्डा सह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे .पुढील तपास ठाणेदार सपोनी गजानन करेवाड (ठाणेदार) पो.स्टे. साखरखेर्डा.करीत आहेत..
Discussion about this post